‘लोणार सरोवर’ विकासाचा आराखडा तयार करा : मुख्यमंत्री

CM

बुलडाणा : लोणार सरोवरात जैवविविधता विकसित झालेली आहे. या सरोवराचा विकास करताना एक निश्चित नियोजन तयार करावे. त्यानुसार आराखडा तयार करावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, तरच हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपास येईल, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोणार सरोवर येथे ‘वनकुटी व्ह्यू पॉइंट’ला भेट दिली. यावेळी त्यांनी लोणार सरोवराविषयी माहिती जाणून घेतली. सरोवर ठिकाणचा विकास कोणत्या पद्धतीने व्हावा याचा विचार एकत्रितरीत्या करावा. या ठिकाणी मंदिरांची संख्या अधिक आहे. या ठिकाणची वनसंपदा धोक्यात येऊ नये, यासाठी मर्यादितच प्रवेश ठेवावा. लोणार सरोवराचा विकास रणथंबोरच्या धर्तीवर करता येऊ शकतो काय, याचीही पडताळणी करावी.

हे सरोवर वन पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी वैज्ञानिकही मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांचाही विचार करणे गरजेचे आहे. पर्यटकांसाठी सरोवराच्या वरच्या बाजूला एक पायरस्ता ठरवावा. या रस्त्यावर पर्यटकांना थांबण्यासाठी स्थळे विकसित करावी. अशी व्यवस्था झाल्यास पर्यटकांना सोयीचे होईल, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER