कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सामन्याची तयारी करा – अजित पवार

Ajit Pawar

जळोची :- बारामती तालुक्‍यामध्ये रोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका आहे हे लक्षात घेऊन त्याबाबत योग्य नियोजन करा, तालुक्‍यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ते बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात आढावा बैठकीत बोलत होते.

नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता फरांदे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार विजय पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, बांधकाम विभाग पुणे मंडळ अतुल चव्हाण, बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, उपअभियंता विश्‍वास ओव्हाळ, कार्यकारी अभियंता, सिल्व्हर ज्युबली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, माजी आरोग्य सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेता सचिन सातव उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button