क्रांतीसाठी तयार रहा : डॉ. तुषार गांधी

कोल्हापूर : सध्या देशाचे संविधान म्हणजे देशाचा आत्मा बदलण्याची तयारी सुरू आहे. हे सुरु असताना आराजकेतला आपण मान्यता देत, प्रश्न विचारण्याचा हक्क गमावून बसत आहोत. एका मेणबत्तीने बदल होणार नाही तर क्रांतीची मशाल पेटवावी लागेल, असे सांगून महात्वा गांधी यांचे नातू आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. तुषार गांधी यांनी नव्या क्रांतीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन गुरूवारी येथे केले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त शाहू स्मारक येथे श्रमिक प्रतिष्ठानतर्फे जागर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. गांधी भारत नव्या स्वातंत्र्य लढ्याच्या उंबरठ्यावर’ या विषयावर व्याख्यान दिले. गीतकार जावेद अख्तर यांची प्रमुख उपस्थिती होती.

भास्कर जाधव यांच्या नाराजीची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल?

डॉ. गांधी म्हणाले, ‘विचारांचा खून करणाऱ्यांची घरे आपल्याला माहीत आहेत तरीही आपण त्यांना विचारत नाही. त्यामुळे आम्ही देशात राहण्याचे पात्रतेचे आहोत की नाही असा प्रश्न पडतो. देशाच्या मूळ विचारधारेचा आत्मा बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. कॉ. पानसरे यांच्या हत्येला ५ वर्षे उलटून गेली तरीही त्यांचे मारेकरी अद्याप सापडेलेले नाहीत ही शरमेची बाब आहे. अराजकतेला अपण इतकी मान्यता का दिली आहे ?, प्रश्न विचारण्याची ताकद आपण गमावली आहे. देश चालविणारे देशद्रोहींना गोळ्या मारा असे विधान करीत आहेत. आपण गप्प हे पाहत आलो आहोत. विदेशात गेल्यावर भारतात क्रांती का होत नाही ? अशी विचारणा अनेकदा होते. १९४७ स्वातंत्र्यलढ्यात प्रत्येक भारतीयाने हिरीहिरीने सहभाग घेतला होता. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाले .

गांधीजींनी सांगितले होते जे कायदे लोकांच्या हिताचे नाहीत त्या कायद्याविरुध्द राजद्रोह करण्याचा अधिकार जनतेला आहे. त्याविरोधात सत्याग्रह करण्याची तयारी जनतेने ठेवली पाहीजे. आजही सत्याला घाबरणारे लोक गोळी चालवत आहेत. खोटे बोलत आहेत. इतिहास त्याचा साक्षीदार आहे. न्याय होत नसेल तर सरकार कोणाचेही असो त्याविरोधात सत्याग्रह करा. या विरोधात लढण्याची गरज आली आहे. या लढ्यासाठी मला तुरुंगात घातले तरी त्याची पर्वा नाही.
संविधान वाचविण्यासाठी गांधीजींचे विचार मानणाऱ्या लोकांना घेवून साबरमती आश्रम ते दांडी या दरम्यान पायी यात्रा काढणार आहे. माझ्या देशात मला यात्रा काढण्यासाठी परवानगी घेण्याची काय गरज आहे ? यासाठी कोणतीही परवानगी घेणार नाही. बघतोच कोण अडवतेय ते ? असेही डॉ. गांधी यांनी यावेळी आव्हान दिले.

डॉ.गांधी म्हणाले,

सत्याग्रहाची सफलता अन्याय सहन करणाऱ्यांवर ठरते.

संविधानाच्या समर्थनात साबरमतीहुन दांडी यात्रा काढणार. त्यासाठी परवानगीची गरज नाही. ती घेणारपण नाही. कॉ. पानसरेचा यांचा फोटो पाहून बापूंची आवठण झाली. पानसरे यांच्या मारेकरी अजून सुरक्षित कसे? आराजकेतला आपण मान्यता दिलीय याच हे प्रतीक मानाव काय? एकट्या गांधीजींमुळे देश स्वातंत्र झाला नाही तर प्रत्येकाने ती जबादारी खांद्यावर घेतली होतीजो पर्यंत देश वाचायची जबादारी आपल्या खांद्यावर घेणार नाही तोपर्यंत बदल होणार नाही विचारवंतांच्या हत्या कोणी केल्या याचा जाब विचारण्याचा तरी आपणास अधिकार आहे काय? देशाला वाचवण्यासाठी आता कडू औषधच द्यावे लागेल.