मराठा आरक्षणाबाबत केंद्राने निर्णय घ्यावा, यासाठी पंतप्रधानांना भेटण्याची तयारी – मुख्यमंत्री

PM Modi-Uddhav

मुंबई : महाराष्ट्र कोरोना (Corona) विरुध्दची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे दुर्देवच म्हणायला हवे अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीसोबतच मराठा आरक्षणाच्या ज्वलंत विषयावरही भाष्य केलं.

यावेळी ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक आहे. तसेच हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने न्याय कुठे मिळेल हेही सांगितल्याचं त्यांनी नमूद केलं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा नसून केंद्र सरकारचा आहे असं सांगितल्याचं नमूद करत, याबाबत केंद्राने निर्णय घ्यावा. यासाठी पंतप्रधानांना भेटण्याचीही आपली तयारी आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पात्र लिहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी सर्व पक्षांनी एकमुखी एकमताने मराठा आरक्षणाला आरक्षण देण्याचा कायदा केला. उच्च न्यायालयात लढाई जिंकली आणि त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. नेमक्या या कोरोनाच्या लढ्यातच हा निराशाजनक निकाल आला. सर्वांनी एकमुखाने घेतलेल्या या आरक्षणाविरोधात निकाल दिला. काहीजण सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली नसल्याचा आरोप करतात. मात्र, हे खंर नाही. उच्च न्यायालयात असलेले वकीलच सर्वोच्च न्यायालयात होते. उलट त्यांना मदतीसाठी आणखी वकील दिली. मराठा समाजाने आणि नेत्यांनी खूप संयमी प्रतिक्रिया दिली. थयथयाट केला नाही. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी खूप चांगली भूमिका घेतली.”

सर्वोच्च न्यायालयाने पुढे न्याय कुठे मिळेल हे सांगितलंय. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा मराठा आरक्षणाचा खूप चांगला अभ्यास आहे. त्यांनी मागील काळात खूप बैठका घेतल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्यांना नसून केंद्र सरकारला आहे असं सांगितलं. असं करुन सर्वोच्च न्यायालयाने न्याय कुठे मिळेल हे सांगितलंय. त्यामुळे मी पंतप्रधान मोदींना हात जोडून विनंती करतो की मोदींनी कल ३७० प्रमाणेच हिंमत आणि संवेदनशीलता मराठा आरक्षणात दाखवावी, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाली असून त्याचा अभ्यास सुरु झालाय. त्यात आणखी काही मार्ग दाखवले आहेत का? हेही तपासले जातील. आम्ही सर्व पक्ष एकत्र आहोत. ही मागणी एका समाजाची नाही, त्यामुळे या मागणीचा अनादर पंतप्रधान, राष्ट्रपती आणि केंद्र सरकार करणार नाही अशी मला आशा आहे.

राज्य सरकार आरक्षणाच्या विरोधात असतं तर लढाई समजू शकलो असतो. पण सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने लढत आहे. पण लढाई अजून संपलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने तुमचा अधिकार नाही, असं राज्य सरकारला सांगितलं आहे. पंतप्रधानांनी काश्मीरचे ३७० कलम रद्द करताना संवेदनशीलता दाखवलं त्याच संवेदनशीलतेची आता गरज आहे. पण यानिमित्ताने कुणी महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नयेत. जनतेने उगाच डोकी भडकवून घेवू नये, मी मराठा समाजाचा धन्यवाद मानतो. त्यांनी फार सामंजसपणे निर्णय ऐकला आहे. कुठेही थयथयाच, आदळाआपट केली नाही. त्यामुळे धन्यवाद देतो. त्यांच्या नेत्यांनीही सामंजसपणे घेतलं. विशेष करुन छत्रपती संभाजीराजे यांनी अत्यंत समजंसपणे प्रतिक्रिया दिली.

देशात तिसरी लाट येत आहे. आज आपल्याकडे ७ लाख सक्रिय रुग्ण होते. ही रुग्णवाढ आपण थोडीशी खाली आणली आहे. पण काही जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ होत आहे. सुप्रीम कोर्टाने आपण मुंबईत आणि महाराष्ट्रात कोरोना विरोधात जी लढाई लढत आहोत त्याचं कौतुक केलं आहे. आपल्यामुळेच ते शक्य झालं. त्यामुळे मी आपणा सर्वांचा आभारी आहे. राज्यात कोरोना रुग्ण हळूहळू कमी होत आहेत. मात्र, अजून जिंकलेलो नाहीत. आता इतर राज्यही लॉकडाऊन करत आहेत. ही आता कोरोना लढाईची आवश्यकता बनली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button