जानेवारीपासून कोल्हापुरात कोरोना लस देण्याची तयारी

Corona Vaccine

कोल्हापूर : जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याची तयारी सुरु झाली आहे. आरोग्य सेवित काम करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. तर खासगी आरोग्य सेवेतील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनीही आपली नोंदणी शासकीय यंत्रणेकडे करावी. तसेच जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 5 लाख 57 हजार 176 जणांना लस दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे. कोरोना लसीकरणाच्या अंमलबजावणीच्या पूर्व तयारीसाठी जिल्हा कृतीदल समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली, यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी श्री देसाई म्हणाले, राज्य शासनाकडून जानेवारी महिन्यापासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आरोग्य सेवेतील सर्व कर्मचारी यांचा समावेश आहे. खासगी आरोग्य सेवतील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचा-यांनी लसीकरणासाठी तालुका आरोग्य अधिकारी, शहर आरोग्य अधिकारी, ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपर्क साधून नोंदणी करावी.

सर्व शासकीय डॉक्टर्स, आरोग्य सेवक यांची नोंदणी 100 टक्के पूर्ण झाली आहे. खासगी डॉक्टर्स आणि खासगी आरोग्य यंत्रणेशी निगडीत काम करणारे जे सेवक आहेत, संस्था आहेत यांची नोंदणी अद्यापही अपूर्ण आहे. जे वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहेत आणि ज्यांनी वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी केली आहे अशा सर्व डॉक्टर्स आणि त्यांच्या दवाखन्यात काम करणारे सर्व आरोग्य सेवक आणि पॅरामेडीकल स्टाफ यांनी आपली नोंदणी तालुका आरोग्य अधिकारी, शहर वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका आयुक्त कार्यालयात नोंदणी करावी असे आवाहनही केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER