वाराणसीतून मोदींविरुद्ध लढण्याची तयारी; पटोलेही मैदानात

nana Patole - modi

नागपूर :  काँग्रेसचे (Congress) खासदार सुरेश धानोरकर (Suresh Dhanorkar) यांनी वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेस (Congress) हायकमांडसोबत चर्चा करणार, असे धानोरकर यांनी सांगितले. काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हेही मैदानात उतरले आहेत.

मोदींना पराभूत करण्यासाठी अनेक काँग्रेस नेत्यांनी हातमिळवणी केली आहे. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीमधून निवडणूक लढण्यास तयार आहे, अशी घोषणा नाना पटोलेंनी केली. “सरकारचे कृषी कायदे रद्द केल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही. भाजपामध्ये खासदार असताना नरेंद्र मोदींना आव्हान देत राजीनामा दिला होता. आता थेट नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी आहे. केवळ पक्षाने आदेश देण्याची गरज आहे.

सुरेश धानोरकर यांनी मोदींविरुद्ध लढण्याची तयारी दर्शविली होती. निवडणुका योग्य नियोजनाने लढाव्या लागतात. निवडणूक कशी जिंकता येईल, हे चांगलेच माहीत आहे. आधी निवडणूक हरलो, तेव्हा चांगला परिपाठ शिकलो. तेव्हापासून मी कोणतीही निवडणूक हरलो नाही. माझ्या हातात तीन वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे मोदींविरुद्ध विजय मिळवणे कठीण नाही.” असेही पटोले म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER