यूपी विधानसभा निवडणुकीची तयारी; मोदींच्या उपस्थितीत झाली ‘भाजपा-आरएसएस’ची बैठक

BJP - RSS - Maharashtra Today

उत्तर प्रदेश : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे आव्हान निर्माण झाले आहे. परिस्थिती अजूनही कायम आहे. उत्तर प्रदेशातीलही स्थिती गंभीर आहे. गंगा नदीत वाहून आलेल्या प्रेतांमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार टीकेचे धनी ठरले. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यात आला. उत्तर प्रदेशात पुढीलवर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपाने सुरू केली आहे. याबाबत रविवारी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपा आणि आरएसएस नेत्यांची उपस्थिती होती.

आगामी वर्षात उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यावरून भाजपातील खासदार आणि नेत्यांकडून योगी सरकारवर टीका होत आहे. त्यामुळे भाजपने सरकारची प्रतिमा सुधारण्याचे आणि विधानसभा निवडणुकांचे धोरण ठरविण्याचे काम सुरू केले आहे.

या अनुषंगाने रविवारी भाजपा-आरएसएसची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत उत्तर प्रदेशात २०२२मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशात महत्त्वाच्या पंचायत समितीच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये भाजपाला चांगलाच झटका बसला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमध्ये समाजवादी पक्षाने मोठा विजय मिळविला. तर मथूरा आणि इतर पंचायत समितीचे निकालही भाजपाला चिंतन करायला लावणारे आहेत. या निकालातून धडा घेत आणि कोरोना हाताळणीवरून होत आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजपाचे खासदार, मंत्री आणि नेतेच योगी सरकारवर टीका करत असल्याचे बैठकीत चर्चा करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button