पुण्यासह राज्यात अकाळी पावसाचे सावट; ‘या’ जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता

Heavy Rains

पुणे : काल पुण्यासह अहमदनगर, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अकाळी पाऊस झाला. राज्यात अजूनही पावसाचे ढग आहेत. या आठवड्याच्या शेवटी, शनिवारी आणि आणि रविवारी पुण्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अकाळी पावसाचा (Heavy Rains) फटका बसण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला. महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी तपमानाचा पारा घसरला आहे.

दरम्यान, विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कमाल तपमानाने चाळिशी पार केली आहे. आज चंद्रपूर आणि वर्धा येथे सर्वाधिक तपमानाची (४२.६) नोंद झाली. विदर्भातील किमान तपमान वाशीम जिल्ह्यात (१८.३) नोंदले गेले. कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतो आहे.

शनिवारी आणि रविवारी मराठवाड्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात अकाळी पाऊस पडणार आहे. याचा सर्वाधिक फटका अहमदनगर, पुणे, बीड, उस्मानाबाद, लातूर, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना बसणार आहे. या जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उद्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे.

येत्या तीन ते चार तासांत नंदूरबार, बीड आणि सातारा या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर नंदूरबार, बीड आणि सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button