प्रीती झिंटाही झाली निर्मात्री, ऋतिकला घेऊन बनवणार वेबसीरीज

Preity Zinta-Hrithik Roshan

गालावरील गोंडस खळीने सगळ्यांना वेडे करणारी अभिनेत्री म्हणजे प्रीती झिंटा (Preity Zinta). तिचे हास्य आणि तिच्या सौंदर्याने अनेकांना वेड लावले होते. प्रीतीने अनेक हिट सिनेमे जसे दिले तसेच ती विविध कारणांनी वादातही सापडली होती. आयपीएलमध्येही तिने किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या माध्यमातून गुंतवणूक केली होती. सिनेमातून कमवलेला पैसा असला तरी तिने सिनेनिर्मितीच्या क्षेत्रात मात्र पाऊल टाकले नव्हते. तिने कमाल अमरोही स्टुडियो घेतल्याच्या बातम्या मात्र होत्या. गेल्या काही वर्षांपासून प्रीती तिच्या पतिसोबत लॉस एंजिलिस येथे राहात असून कामासाठी ती मुंबईत ये-जा करीत असते. याच प्रीतीने आता निर्मितीतही उतरण्याचे ठरवले आहे. प्रीती प्रथमच वेबसीरीज बनवणार असून यासाठी तिने तिचा मित्र ऋतिकची मदत घेतली आहे.

प्रीतीने एंटरटेनमेंट कंपनी स्थापन केली असून तिने डिज्नी हॉटस्टॉरसोबत एक करार केला आहे. या करारानुसार ती एक वेबसीरीज तयार करणार आहे. जॉन ले कार लिखित ‘द नाइट मॅनेजर’ कादंबरीवर आधारित ही वेबसीरीज आहे. या वेबसीरीजचे दिग्दर्शन संदीप मोदी करणार आहे. या वेबसीरीजमध्ये नायक म्हणून ऋतिक रोशनला साईन करण्यात आले आहे. प्रीती आणि ऋतिकने कोई मिल गया, मिशन कश्मीरमध्ये एकत्र काम केले आहे. या सिनेमाच्या दरम्यानच या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. त्यामुळेच प्रीतीने वेबसीरीसीजसाठी विचारताच ऋतिकने लगेचच होकार दिल्याचे सांगितले जात आहे.

ऋतिकने अजून डेट्स दिलेल्या नसल्याने या वेबसीरीजचे शूटिंग कदाचित मार्च-एप्रिलनंतर सुरु केले जाईल असे म्हटले जात आहे. ऋतिकने आताच्या जरी डेट्स दिल्या नाही तरी यावर्षी कधी तरी तो या वेबसीरीजचे शूटिंग सुरु करील असे सांगितले जात आहे. या वेबसीरीजच्या माध्यमातून ऋतिक रोशन ओटीटी प्लॅटफॉर्मवर एंट्री करणार आहे. मोठ्या पडद्याप्रमाणे छोट्या पडद्यावही ऋतिक यशस्वी होईल यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER