लॉक़डाऊनमध्ये ‘गुड न्यूज’ देणाऱ्या बॉलिवूडमधील अभिनेत्री

कलाकार सतत आपल्या शूटिंगमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना एकमेकांसाठी वेळ काढणे कठिण होते. मात्र लॉकडाऊनमुळे (Lockdown) सगळं बंद असल्याने कलाकारांना एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. बरं ही संधी काही दिवसांपुरती होती असे नव्हे तर जवळ-जवळ सहा महिने या कलाकारांना आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता आला. कुटुंबासोबत परदेश दौरेही करता आले. या लॉकडाऊनच्या काळात काही अभिनेत्रींनी ‘गुड न्यूज’ (Good News) दिली आहे.

या नायिकांमध्ये अनुष्का शर्माचे (Anushka Sharma)नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. पति विराट कोहली (Virat Kohli) क्रिकेटर असल्याने त्याचे सतत दौरे असत तर अनुष्काही शूटिंगमध्ये व्यस्त असायची. 11 डिसेंबर 2017 ला या दोघांनी लग्न केले होते. पण बराच वेळ एकत्र राहाण्याची संधी त्यांना यंदा मिळाली. लॉकडाऊनमुळे या दोघांना बराच वेळ एकत्र घालवता आला. अनुष्का गरोदर असून जानेवारी महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे. लॉकडाऊनच्या काळात अनुष्का आणि विराटने घरातील विविध पोजमधील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. एवढेच नव्हे तर दोघांनी घराच्या गच्चीत क्रिकेट खेळतानाचा व्हिडियोही शेअर केला होता. आयपीएल सुरु झाल्यावर अनुष्का आणि विराट आता यूएईमध्ये आहेत.

करीनाही दुसऱ्यांदा आई होणार आहे. करीनानेही (Kareena) गरोदरपणाची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. करीना आणि सैफने प्रसिद्धी पत्रक काढून आनंदाची बातमी सगळ्यांना दिली होती. पहिला मुलगा तैमूर आणि पति सैफसोबत तिने विविध फोटो शेअर केले. एवढेच नव्हे तर बेबी बम्पचेही प्रदर्शन ती वेळोवेळी सोशल मीडियावर करीत असते. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये करीना दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.

चक दे इंडियामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री सागरिका घाटगे (Sagarika Ghatge)ही गरोदर आहे. सागरिकानेच स्वतः सोशल मीडियावर याची माहिती जाहिर केली होती. सागरिकानेही प्रख्यात क्रिकेटपटू झहीर खानसोबत लग्न केलेले आहे. सागरिका राजघराण्यातील आहे. 2017 मध्ये या दोघांनी लग्न केले होते. सागरिकाही पुढील वर्षी बाळाला जन्म देणार आहे.

मैं हूं ना, विवाह अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलेली अमृता रावही (Amruta Rao) गरोदर आहे. अमृता रावने आरजे अनमोलसोबत 2016 मध्ये लग्न केले होते. अनमोल अमृताची मुलाखत घ्यायला गेला तेव्हाच दोघांचे सूत जुळले आणि त्यांनी लग्न केले होते. अमृतानेही गरोदर असल्याची घोषणा केली असून ती प्रथमच आई बनणार आहे.

अभिनेत्री अनिता हसानंदानीही गरोदर आहे. अनिताने 2013 मध्ये रोहित रेड्डीसोबत लग्न केले होते. अनिता आता गरोदर असून तिने सोशल मिडियावर एक व्हीडियो टाकत ही आनंदाची बातमी प्रशंसकांसोबत शेअर केली होती. अनिता फेब्रुवारीमध्ये बाळाला जन्म देणार आहे.

छोट्या पडद्यावरील प्रख्यात अभिनेत्री टीजे सिद्धू आणि करणवीर बोहरा यांच्या घरीही छोटे बाळ येणार आहे. या दोघांना अगोदरच बेला आणि व्हिएना या जुळ्या मुली आहेत. आता ती तिसऱ्या मुलाला जन्म देणार आहे.

अॅमी जॅक्सनने सप्टेंबरमध्ये एका बाळाला जन्म दिला. तिनेही ज्याप्रमाणे गरोदरपणाची माहिती सोशल मीडियावर देताना बेबी बम्पचे फोटो शेअर केले होते. त्याच प्रमाणे तिने बाळाचा पहिला फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आणि तिच्या आनंदात सगळ्यांना सहभागी करून घेतले होते. अॅमी बॉयफ्रेंड जॉर्जबरोबर लिव्ह इनमध्ये राहात होती. परंतु गरोदर राहिल्यानंतर अॅमी आणि जॉर्जने साखरपुडा केला. अॅमीने स्वतःचे गरोदरपणाचे फोटो टाकत असतानाच गरोदरपणात काळजी कशी घ्यावी याचे धडेही देण्यास सुरवात केली होती.

अभिनेत्री ब्रुना अब्दुल्लानेही सप्टेंबरमध्ये एका मुलाला जन्म दिला. तिनेही सोशल मीडियावर बेबी बम्पचे फोटो शेअर केले होते आणि मुलीचा पहिला फोटोही तिने शेअर केला होता. मुलीचे नाव तिने इझाबेल ठेवले आहे. ब्रुना ब्राझिलियन असून अक्षय कुमार, जॉन अब्राहम अशा मोठ्या नायकांसोबत तिने काम केले आहे. आय हेट लव्ह स्टोरी, ग्रॅन्ड मस्ती, देसी बॉईज, मस्तीजादे आणि कॅश या चित्रपटांमधून तिने काम केलेले आहे. गेल्यावर्षी तिने ब्रिटीश बॉयफ्रेन्ड अॅलन फ्रेजरसोबत साखरपुडा केला मात्र अजून दोघांनी लग्न केलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER