
बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी बर्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण काही चित्रपट त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत. यातील एक चित्रपट म्हणजे ‘लम्हे’. या चित्रपटाला २९ वर्ष पूर्ण झाले आहेत. या खास प्रसंगी अनुपम खेर यांनी या चित्रपटाशी संबंधित काही अनमोल आठवणी चाहत्यांसह शेअर केल्या आहेत.
अनुपम खेर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतात. ते सहसा बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. याशिवाय अनुपम खेर देश व जगाशी संबंधित अनेक समकालीन मुद्द्यांवरही आपले मत मांडतात. त्यांना सोशल मीडियावर १.८ कोटींपेक्षा अधिक लोक त्यांना फॉलो करतात आणि त्यांच्या पोस्टला पसंतीही देतात.
अलीकडे अनुपम खेर यांनी अनिल कपूर आणि श्रीदेवीसोबतचे काही जुनी फोटो शेअर केली आहेत. ही फोटो ‘लम्हे’ चित्रपटाच्या सेटची आहेत. हे फोटो शेअर करताना अनुपम खेर यांनी लिहिले की, ‘लम्हे’ चित्रपटाने गेल्या २९ वर्षात एक संस्मरणीय चित्रपट म्हणून नावलौकिक मिळवला आहे, शिवाय या चित्रपटाच्या शूटिंगच्या अनुभवाशिवाय माझ्या आठवणींपैकी एक आहेत.
अनुपम पुढे लिहितात, ‘खासकरुन यशजी, अनिल कपूर आणि वाहिदा रहमान जी यांच्यावर चित्रित केलेले एक मजेदार गाणे ज्याचे नृत्यदिग्दर्शक सरोज खान जी होते. चित्रीकरण करताना आम्हाला खूप मजा आली. आपण हे पुन्हा पुन्हा पाहू शकता. ‘ हे सर्व फोटोज पाहून याचा अंदाज बांधता येतो की शूटिंगच्या वेळी त्या सर्वांनी सेटवर खूप मजा केली होती.
१९९१ मध्ये रिलीज झालेल्या ‘लम्मे’ चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीने (Sridevi) आई आणि मुलगी या दोघांची भूमिका केली होती. या चित्रपटात अनिल कपूर (Anil Kapoor) मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाची गाणी चांगलीच गाजली. त्याचबरोबर श्रीदेवीवर चित्रित ‘मोरनी’ हे गाणे आजही लोकांच्या जिभेवर आहे. हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट होता.
Shooting for #Lamhe will always remain one of my most treasured memories!! Especially the medley song with #YashJi @AnilKapoor #WahidaRehman ji, #SarojKhan ji & the ultimate #Sridevi. You can watch the medley again & again & again. 🌺😍 ##29yearsOfLamhe #JaiHo #Unforgettable pic.twitter.com/LrplBTEvMy
— Anupam Kher (@AnupamPKher) November 22, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला