
पुणे : ३० मेपासून राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील असा दिलासादायक अंदाज भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यवक्त केला आहे. सध्या प्रचंड उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी हा मोठा दिलासा आहे. दरम्यान, हवामान खात्याने गुरुवारीच मान्सून १ जूनला केरळात दाखल होईल, असे म्हटले होते. अरबी समुद्रात मान्सूनच्या प्रेवेशसाठी पोषक असणारा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मान्सूनची पुढची वाटचाल अडथळ्यांशिवाय होईल, असे IMD ने म्हटले होते.
ही बातमी पण वाचा:- मान्सून एक जूनला केरळात पोहचणार
दरम्यान मालदीव-कोमोरिन परिसरात मान्सूनचा पाऊस पडतो आहे. बंगालच्या उपसागराचा परिसर व अंदमान-निकोबार बेटांच्या परिसरातही काहीप्रमाणात मान्सूनच्या सरी बरसल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
महाराष्ट्रातील बहुतांश शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. साधारण साडेचार महिने पडणारा पाऊस शेतीसाठी लागणाऱ्या ७० टक्के पाण्याची गरज भागवतो. यंदा राज्यावर कोरोनासारखे भीषण संकट ओढावले आहे. या अडचणीच्या काळात राज्यात समाधानकारक पाऊस पडला तर अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल. भारताची अर्थव्यवस्था ही आशिया खंडातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. हवामान खात्याने यापूर्वी वर्तविलेल्या अंदाजानुसार, यंदा भारतात मान्सूनचा पाऊस १०० टक्के पडेल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला