अजित पवार कोरोनामुक्त होऊन लवकर घरी यावेत म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे विठ्ठलाला साकडं…

Ajit Pawar

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोनाची लागण झाली . सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत . यापार्श्वभूमीवर त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठलाला साकडं घातले आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातील हजारो हेक्टरवर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान अजित पवार यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. याचदरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अजित पवार यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत असली तरी त्यांना सध्या उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अजित पवार यांनीच सांगितले आहे. पंढरपूर येथील शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदीप मांडवे व त्यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी पाषाण पुंश एकादशीचे औचित साधून संत नामदेव पायरी येथे विठ्ठलाची पूजा केली. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवार लवकर बरे व्हावेत आणि जनतेच्या सेवेसाठी पुन्हा सक्रिय व्हावेत, असं विठ्ठलरुक्मिणी चरणी साकडं घातले . विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक भगिरथ भालके हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यासाठी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठलाला साकडे घातले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER