उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली : प्रवीण दरेकर

Pravin Darekar & Ajit Pawar

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी टीका आहे .

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे विधानपरिषदेच्या उपसभापती पदी आल्या आणि आमचे सरकार आले , म्हणून त्यांना पुन्हा या पदावर नियुक्त केले , अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली . त्यावरून दरेकर यांनी पलटवार केला आहे. “अजितदादांचा पायगुण काय होता हे महाराष्ट्राने पाहिलं. आमच्यासोबत अजितदादा आले सत्तेचं काय झालं?” असा टोला दरेकर यांनी लगावला. अजित पवारांच्या पायगुणाचा उल्लेख करत असताना, “त्यांच्या पायगुणाने आमची सत्ता गेली” ही खंत दरेकर यांनी व्यक्त केली .

विधानपरिषद उपसभापती निवडीवर आमचा आक्षेप कायम आहे. सत्ताधारी सरकारची भूमिका हट्टाची आहे. गुरुवारी न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे, असे असतानाही ही निवडणूक घेण्यात आली, असे दरेकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER