हुकूमाची पानं मोदींच्या हातात असतील तर तुमची गरजच काय ; दरेकरांचा संजय राऊतांना टोला

Pravin Darekar and sanjay raut

मुंबई :- मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे . शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्राच्या कोर्टात असून मराठा आरक्षणाची हुकूमी पानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हाती आहेत. त्यांनीच ही पानं टाकावीत असी टीका केली होती. त्यावर ‘हुकूमाची पानं मोदींच्या हातात असतील तर तुमची गरजच काय’ असा पलटवार भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी राऊतांवर केला आहे.

भाजपला मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची जाणीव आहे. मात्र, महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) कायम आपल्याला जमत नाही ती गोष्ट केंद्रावर ढकलण्याचे काम करते. संजय राऊत यांना तर रोज उठून मोदी आणि भाजपवर बोलल्याशिवाय चैन पडत नाही.’

महाविकासआघाडीच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणासाठी राज्यपालांना पत्र दिलं होतं. मात्र, त्या माध्यमातून आरक्षण मिळवणं इतकं सोपं आहे का?, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. त्यासाठी प्रस्ताव सादर करावा लागेल. मग राष्ट्रपतींच्या माध्यमातून तो आयोगाकडे पाठवावा लागेल. यासाठी बराच वेळ जाईल. मात्र, ठाकरे सरकार सर्व गोष्टी केंद्रावर ढकलून दिशाभूल करत आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.

ही बातमी पण वाचा : नरेंद्र मोदींच्या हातात हुकमाची पानं , मराठा आरक्षणावर निर्णय घ्यावा : संजय राऊत 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button