पंतप्रधान मोदींच्या क्रांतिकारी निर्णयाने ठाकरे सरकारच्या ग्लोबल टेंडरची हवाच काढली: प्रवीण दरेकर

मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Crises) रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देशातील सर्व वयोगटाच्या नागरिकांना मोफत लस (Free vaccination) देण्याचा घेतलेला निर्णय हा क्रांतिकारी असल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केले.

ही बातमी पण वाचा:- मोदींना आज मुख्यमंत्री ठाकरे नेमके मागणार तरी काय?

कोरोनाच्या संकटात आम्हाला लस विकत घेण्याची परवानगी द्या, अशी मागणी अनेक राज्य करत होती. त्यानुसार दीड महिन्यांपूर्वी तशी परवानगी दिली होती. मात्र, त्यानंतर महाराष्ट्र सरकारने लसीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा गाजावाजा करण्यापलीकडे काहीच केले नाही. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा करुन हा विषयच संपवून टाकला आहे, असे प्रविण दरेकर यांनी सांगितले .

तसेच दरेकर यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केले . उद्धव ठाकरे हे आपल्या कोर्टातील मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात ढकलण्यासाठी ही भेट घेत असतील तर या भेटीमधून काहीही साध्य होणार नाही, असे दरेकर म्हणाले आहेत .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button