शरद पवारांशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांच्यावर पूर्ण विश्वास; ते मुख्यमंत्र्यांना समजावतील

मुंबई :- उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिला निर्णय मेट्रो कारशेड हलविण्यासंदर्भात घेतला होता. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमी मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात पडलेत. सर्वच स्तरांतून मुख्यमंत्र्यांचे कौतुक झाले. मात्र, आता मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारल्यानंचर पुन्हा मेट्रो कारशेडचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आता या प्रकरणात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) मध्यस्थी करतील असा विश्वास भाजप (BJP) नेते व्यक्त करत आहेत. भाजप नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनीही शरद पवार यांच्यावर विश्वास व्यक्त करत शरद पवार यांच्याशी वैचारिक मतभेद आहेत; पण तरीही त्यांच्यावर विश्वास आहे.

जो काय निर्णय ते घेतील, तो व्यवहारी दृष्टिकोनातूनच घेतील आणि मुख्यमंत्र्यांना समजावून सांगतील, असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून कांजूरमार्गच्या जागेवरील मेट्रो कारशेडचे  काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं.

केंद्र आणि राज्याने एकत्र बसून वाद सोडवला तर जनतेची जागा त्यांच्याच वापरात येईल. मग खेचाखेची का? या बसा आणि चर्चा करा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी केंद्राला पर्यायाने भाजप नेत्यांना चर्चेचं आवाहन केलं. कारशेडवरील तोडग्यासाठी मध्यस्थी करण्यास शरद पवार तयार असल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER