…मग तुम्ही कशाला राज्य सरकार चालवता? भाजप नेत्याचा सवाल

CM Thackeray-Praveen Darekar

मुंबई : औरंगाबादचं संभाजीनगर (Sambhajinagar) नामकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारने ऊठसूट कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणे बंद केलं पाहिजे. अशा शब्दांमध्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर  निशाणा साधला .

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारने ऊठसूट कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणे बंद केले पाहिजे. अशा शब्दांमध्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर (MVA Govt) निशाणा साधला आहे. तसेच कुठल्याही शहराचे नामकरण करण्यासाठी महापालिकेचा प्रस्ताव, राज्य सरकारची मंजुरी आणि मग केंद्राची मान्यता अशी प्रक्रिया आहे.

औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करायचं  असेल तर महापालिका तुमची आहे तिथे ठराव करा, राज्याच्या कॅबिनेटला निर्णय द्या, असेदेखील दरेकर यांनी सांगितले आहे. यांचा (राज्य सरकारचा) एकही विषय, एकही दिवस, एकही सेकंद केंद्राशिवाय जात नाही. कुठलीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट दाखवयचं, मग तुम्ही कशाला राज्य सरकार चालवता? महाकाली लेणी संदर्भात निर्णय घेताना तुम्ही केंद्राला विचारलं होतं का? आमच्या अस्मितेसंदर्भात कुठलाही विषय केंद्राकडे अडकणार नाही. आम्ही त्याच्या पाठीशी असू. परंतु नाचता येईना अंगण वाकडं अशी त्यांची गत झालेली आहे.

ही बातमी पण वाचा :बाळासाहेबांचा शब्द प्रमाण मानून मुख्यमंत्र्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावे; शरद पवारांचा सल्ला 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER