भाजपनं ठरवलं तर तुम्ही रक्तबंबाळ व्हाल; दरेकर यांचं राऊतांना सणसणीत प्रत्युत्तर

Praveen darekar-Sanjay Raut

मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) घणाघाती हल्ले करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. किरीट सोमय्या हे माजी खासदार आहेत. त्यांच्या बोलण्याला त्यांचा पक्षही गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्यांनी खोटेनाटे आरोप करणं थांबवावं, असं सांगतानाच जुनी थडगी आम्हालाही उकरता येतात. पण मागचं विसरून पुढे जावं ही आमची भूमिका असते. आम्हीही जुनी थडगी उकरली तर तुमच्या पापाचे सांगाडेच सापडतील, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला होता. यावर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

महाविकास आघाडीचं सरकार आम्ही एक वर्ष चालवलं आहे, असे मघाशी संजय राऊत म्हणाले. राऊतांना माध्यमांशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही. पण गेल्या वर्षात तुम्ही काय केलं? असा सवाल उपस्थित करत आजही तुम्ही कोव्हिड कंट्रोल करू शकत नाही. सगळं राज्य विस्कळीत आहे. ते स्वत:च भीतीने ग्रासले आहेत. त्यामुळे सारखं सावलीसारखं भिऊन सरकार पाडून दाखवा, असं आव्हान कोणीही देत नाहीत. तरीही ते बोलतात, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

ऑपरेशन लोटसबाबत आम्ही काहीच बोललो नाहीत. भाजपनं ठरवलं तर तुम्ही रक्तबंबाळ व्हाल, खरचटायचं सोडाच. बोलायला फक्त संजय राऊतांनाच येत नाही. उद्या सगळ्यांनी तोंड उघडलं तर थडगी काय आणि दुसरं काय हे सगळं समजेल. त्यामुळे कोणी कोणाला आव्हान देऊ नये आणि आव्हानाच्या भाषा करूच नयेत, असा टोलाही प्रवीण दरकेरांनी  लगावला.

ही बातमी पण वाचा : देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रमुख नेते मला त्यांना राष्ट्रीय स्तरावर मोठं झालेले पाहायचंय : संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER