गडकिल्ल्यांवर बसून ‘शिवचरित्र’ वाचून दाखवा

Praveen Vitthal Tarde

मुंबई : विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेते, लेखक व दिग्दर्शक ‘प्रवीण विठ्ठल तरडे’ नेहमीच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांची मने जिंकत असतात. सध्या मराठी चित्रपटसृष्टीतले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून प्रवीण विठ्ठल तरडे (Praveen Vitthal Tarde) यांना ओळखले जाते.

नुकतेच त्यांनी मीडियावर आपल्या मुलाबरोबर फोटो शेअर केला. या फोटोवर चाहत्यांचे लक्ष वेधत आहेत. त्यांनी कॅप्शन लिहिले आहे. ते म्हणजे, “मुलांना ट्रिपला ‘थंड हवेच्या’ ठिकाणी जरूर न्या… पण आपल्या बापजाद्यांनी जिथे त्यांचे ‘गरम रक्त’ सांडले, त्या गडकिल्ल्यांवर न्यायला विसरू नका…” तिथे बसून आपल्या मुलांना ‘शिवचरित्र’ वाचून दाखवा. ही पोस्ट सोशल मीडियावर कौतुक आणि सातत्याने चर्चेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER