कोरोनाच्या नावाखाली प्रश्नांपासून पळ काढण्याचा सरकारचा प्रयत्न – प्रवीण दरेकर

Pravin Darekar - CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यातील कोरोनाचा (Corona) धोका आणखीनच वाढला आहे. दररोज कोरोना रुग्णांच्या वाढत असलेल्या आलेखावरुन सरकारची चिंता वाढू लागली आहे. त्यातच विधीमंडळाचं अधिवेशन होणार आहे. पण भाजपकडून (BJP) मात्र सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. लॉकडाऊन (Lockdown) आणि निर्बंध टाकण्याचा प्रयत्न करत जसं कोरोनाच्या नावाखाली काहीच करायला नको. तसाच अधिवेशनाबाबत वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला.

महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रात प्रचंड प्रमाणात अस्थिरता दिसत आहे. वीज कापल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे, असा आरोप करत दरेकर यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात जे प्रश्न आज उभे आहेत. त्याबाबत समाजातील प्रत्येक घटकांत असंतोष आहे. तो असंतोष आंदोलन आणि मोर्चाच्या रुपातून बाहेर येत, असल्याचा दावाही दरेकर यांनी केला.

शिक्षक आंदोलन, आरोग्य कर्मचाऱ्यांचं आंदोलन, मराठा समाजाचं आंदोलन असे सर्व प्रश्न अधिवेशनाच्या तोंडावर उफाळून येतील. त्यामुळे राज्य सरकार या प्रश्नांबाबत पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी केली. कोरोनामुळे राज्य सरकारने नागपूरचं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेतलं होतं. त्याचा कालावधीही कमी केला होता. तेव्हाही भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार टीका केली होती. आता पुन्हा एकदा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते ठाकरे सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER