‘असून खोळंबा,नसून वळिंबा’ ही म्हण महाविकास आघाडी सरकारसाठी योग्य

Praveen Darekar slams Mahavikas Aghadi government

मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि तौक्ते चक्रीवादळानंतरही नुकसान ग्रस्तांना आर्थिक मदत देण्यास महाविकास आघाडी सरकार करत असलेला विलंब, यावरून भाजपने (BJP) टीका केली आहे. ‘असून खोळंबा,नसून वळिंबा’ ही म्हण, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला चपखल बसते, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा:- राज्यपालांना विमानातून उतरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राज्यघटना शिकवू नये’, भाजपची टीका

‘असून खोळंबा,नसून वळिंबा’ ही म्हण, महाविकास आघाडी सरकारला चपखल बसते.राज्याच्या हितासाठी ह्यांचा सत्तेत असून किंवा नसून पण काहीच उपयोग नाही. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत,उपमुख्यमंत्री पुण्याच्या बाहेर विचार करत नाहीत, अन् कौशल्य विकासमंत्री कामाचं सोडून सर्वकाही बडबडतात, असा टोला प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button