बाळासाहेबांसारखा ठाकरी बाणा उद्धव ठाकरेंनी दाखवावा – प्रवीण दरेकर

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी ठाकरी बाणा दाखवावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. शिवशाही सरकार असताना अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी अनेक मंत्र्यावर आरोप केले त्यांचे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी राजीनामे घेतले होते, तोच ठाकरीबाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवावा, असे दरेकर (Praveen Darekar) म्हणाले.

पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या.

भाजपने थेट शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे या प्रकरणात नाव घेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांचा स्नेह केवळ आणि केवळ सत्तेशी; प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER