शरद पवार जे बोलतात तेच त्यांच्याविरोधात होते : प्रवीण दरेकर

Uddhav Thackeray

मुंबई :- एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्याचा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी समाचार घेतला. पवारसाहेबांचा राज्याला अनुभव आहे. ते नेहमी बोलतात त्याच्याविरोधात होतं. त्यामुळे मी कुठलीही गॅरंटी देत नाही की मंत्रिमंडळात बदल होणारच नाही, असा टोला दरेकर (Praveen Darekar) यांनी पवारांना लगावला.

राष्ट्रवादीत गेलेल्या नाथाभाऊंना आता अनुभव येईल. नव्याची नवलाई आणि नवलाईचे चार दिवस असतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आकसापोटी नाथाभाऊंचा वापर राष्ट्रवादी करेल, असा आरोपही दरेकरांनी केला.

राष्ट्रवादी पक्षप्रवेशानंतर मुंबईहून जळगावसाठी रवाना झालेल्या एकनाथ खडसेंच्या दौऱ्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. शेतकरी अडचणीत असताना तुम्ही प्रवेश सोहळे, आनंद सोहळे आणि शक्तिप्रदर्शन करताय याची खंत वाटते. शेतकऱ्यांवर संकट असताना शक्तिप्रदर्शन करणे किळसवाणे आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

कुठलीही व्यक्ती, कुठलाही नेता हा पक्षापेक्षा मोठा होत नाही. त्याची शक्ती ही कार्यकर्त्यांची शक्ती असते. पण शक्ती दाखवणं, ताकद दाखवण्यापेक्षा शेतकरी कमकुवत झाला आहे, तिथं ताकद दाखवा, असा खोचक टोला दरेकरांनी खडसेंना लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER