राठोडांचा बचाव न करणारे संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे प्रवक्ते? प्रवीण दरेकर

Praveen Darekar-Sanjay Raut

मुंबई: शिवसेनेला (Shivsena) मोठं करण्यात मोठं योगदान देणाऱ्या आणि बंजारा समाज पक्षाच्या पाठिशी उभा करणाऱ्या संजय राठोड यांचा बचाव करण्यासाठी संजय राऊत यांनी कधीही भूमिका घेतली नाही. मात्र, आता ते अनिल देशमुख यांचे भक्कम समर्थन करुन राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) चाकरी इमाने-इतबाहेर करत आहेत. त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) नक्की शिवसेना की राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, असा खोचक प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी उपस्थित केला.

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रवीण दरेकर यांनी अनिल देशमुखांच्या चौकशीची गरज नाही, असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. संजय राऊत यांचे विधान ऐकले तर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना प्रवक्ते केले काय? असा प्रश्न उपस्थित होतो. संजय राठोड यांचे कृत्य चुकीचेच होते. पण त्यावेळी संजय राऊत आपल्या पक्षातील मंत्र्याच्या बाजूने ठामपणे उभे राहिले नाहीत. त्यावेळी चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा घेणे आवश्यक वाटला. तेव्हा चौकशीसाठी राजीनामा घेण्याची गरज नाही, असे राऊत यांना सांगावेसे वाटले नाही. त्यावेळी राऊतांनी संजय राठोड यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का, हे माहिती नाही. मात्र, आता संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची पाठराखण इमाने-इतबारे करताना दिसत आहेत, अशी मिस्कील टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER