शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्याची मानसिकता पूर्वीपासूनची

Praveen Darekar-mahavikas aghadi

मुंबई :- शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्याची मानसिकता सुरुवातीपासूनच होती, असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला अविश्वासपात्र असल्याचा टोमणा मारला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना, शिवसेनेनं २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. यावरून दरेकरांनी शिवसेनेला टोमणा मारला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरून शिवसेनेवर टीका केली आहे. चव्हाण यांच्या गौप्यस्फोटाने शिवसेनेचा खरा चेहरा उघडा पडला, असं ते म्हणाले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला होता. मात्र, शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात सरकार स्थापन केलं. महाविकास आघाडीचं हे सत्ता समीकरण महाराष्ट्रासाठी नवीन आहे, असा  टोमणा फडणवीसांनी मारला.

… शिवसेनेचा खरा चेहरा उघड – देवेंद्र फडणवीस