धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेतल्याने शिवसेनेत अंतर्गत वादळ ; भाजपा नेत्याची माहिती

Praveen Darekar-dhananjay-munde

मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणावरुन (Pooja Chavan Case) संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनीदेखील राजीनामा देण्याची मागणी केली आहे.कजा मुंडेंच्या या मागणीला विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी पाठिंबा दिला आहे . धनंजय मुंडे यांना वेगळा न्याय देण्यात आल्याने शिवसेनेत अंतर्गत वादळ असल्याचा दावाही दरेकर यांनी केला .

संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही, तर महाराष्ट्रातील जनतेचा संताप होता. भाजपा ज्या पद्धतीने आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी अधिवेशन होऊ न देण्याचा इशारा दिला त्यांनंतर यांना प्रतिमेची चिंता वाटू लागली आणि त्यातून तो राजीनामा घेतला. पंकजा मुंडेंची मागणी अत्यंत रास्त आहे. पहिलं आम्हाला वाटलं यांना सर्वांनाच वाचवायचे आहे. पण आता जर यांची नैतिकता जागी झाली असेल तर जो न्याय संजय राठोड यांना आहे, त्याच नैतिकतेवर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी पंकजा मुंडेंची मागणी असेल तर ती बरोबर आहे. त्यांनी राजीनामा द्यावा, महाराष्ट्रातील जनता स्वागत करेल, असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER