मुख्यमंत्र्यांचा केवळ ‘दर्शनाचा कार्यक्रम’; प्रवीण दरेकरांचा टोला

Praveen Darekar-CM Uddhav Thackeray

मुंबई :- तौक्ते चक्रीवादळामुळे (Tauktae cyclone) झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौऱ्यावर (Ratnagiri-Sindhudurg tour) आहेत. मुख्यमंत्र्यांचा दौरा केवळ दर्शनाचा कार्यक्रम आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केली आहे. यासंदर्भात दरेकर यांनी ट्विट केले आहे. विरोधी पक्षनेते तीन दिवस कोकण दौरा करतात आणि मुख्यमंत्री तीन तास दौरा करतात. तसेच विरोधी पक्षनेते कोकणवासीयांच्या बांधावर जाऊन त्यांना विचारपूस करतात.

मात्र, मुख्यमंत्री कोकणात जाऊन केवळ दर्शनाचा कार्यक्रम करतात, असा टोला प्रवीण दरेकर यांनी ट्विटवरून लगावला. रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्गमध्ये नुकसानग्रस्तांची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनीही विरोधकांना टोला लगावला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही (Narendra Modi) टीका-टिप्पणी केली. विरोधक दोन दिवसांपासून कोकणात फिरत आहेत. मात्र, मुख्यमंत्री तीन तासांचा दौरा करतात, या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “मी विरोधकांना उत्तर देण्यासाठी आलेलो नाही. माझ्या कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. चार तासांचा दौरा असला तरी फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही. तसेच हेलिकॉप्टरमधून पाहणी करून तर नाही ना गेलो, निदान जमिनीवर उतरलोय.” असा निशाणा त्यांनी मोदींवर साधला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button