प्रवीण दरेकर अडचणीत, मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी होणार चौकशी!

मुंबई :- धनंजय मुंडे, संजय राठोड, राज्यातील वाढता कोरोना आणि वीजबिलांचा प्रश्न यावरून विरोधी पक्ष असलेला भाजपा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक झाला आहे. भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी संजय राठोड यांच्यासह विविध प्रकरणांवरून राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणात दरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू होती. दरम्यान, या बँकेच्या प्राथमिक चौकशी अहवालामध्ये अनेक बाबी उघड झाल्या आहेत. याप्रकरणी सविस्तर ऑडीट करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. मुंबै बँकेच्या कारभारावर नाबार्डच्या २०१८-१९ च्या अहवालातूनही ताशेरे ओढण्यात आले. हल्लीच हा अहवाल प्राप्त झाला होता. सहकार विभागाने याप्रकरणी सविस्तर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याविरोधात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या पतींवर गुन्हा दाखल झाला होता. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना २०१६ मध्ये लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER