माझ्या उत्तरानंतर प्रवीण दरेकरांनी ट्विट डिलीट केले का? काँग्रेस नेत्याचा सवाल

Maharashtra Today

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने(SC) मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर या मुद्द्यावरून राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरू झाल्या आहेत. मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसविरुद्ध भाजप…, असे चित्र सध्या राज्यात दिसत आहे. ‘आरक्षणावरून भाजपाकडून सतत ठाकरे सरकारवर आरोप होत आहेत.’ असे ट्विट विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी केले होते. याला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी उत्तर दिले. मात्र, हे ट्विट माझ्या उत्तरानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar)यांनी डिलीट केले का?; असा सवाल सावंत यांनी स्क्रीनशॉट ट्विट करून विचारला आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील बनला आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाष्य केले होते. याला प्रविण दरेकर यांनी उत्तर दिले. दरेकरांनी केलेले ट्विट रिट्विट करत सावंत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. ‘उद्या पुन्हा मी भाजपाची पोलखोल करून मराठा आरक्षणाविरुध्द भाजपाचा कुटील डाव उघड करणार आहे.’ असे सचिन सावंत म्हणाले होते.

डिलीट केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत सचिन सावंत यांनी प्रश्ननही उपस्थित केला. “हे ट्विट माझ्या उत्तरानंतर सन्माननीय विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी डिलीट केले का?” असे सावंत म्हणाले.

दरेकर यांचे ट्विट

“‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’ अशी गत सध्या सचिन सावंत यांची झाली असून, कसलीही माहिती न घेता, ते मत ठोकून देतात. मराठा आरक्षण व छत्रपतींचा सन्मान कसा करतात हे भाजपाला शिकवू नका. आरक्षण वाचवणं जमलं नाही, आता किमान सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका तरी दाखल करा.” असे दरेकर यांनी डिलीट केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button