360 मशालींच्या प्रकाशाने उजाळला प्रतापगड

360 मशालींच्या प्रकाशाने उजाळला प्रतापगड

सातारा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा व इतिहासाच्या स्मृती जागवणारा किल्ले प्रतापगड सोमवारी 360 मशालींच्या (360 torches) प्रकाशाने उजाळून निघाला. मात्र, यावर्षी कोरोना संकटामुळे मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने भाविकांमध्ये नाराजी राहिली.

आज चतुर्थी दिवशी भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री 8 च्या दरम्यान कोणताही गाजावाजा न करता शासनाने दिलेल्या सुचनेनुसार फक्त मानकरी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. गडावर सर्वत्र लावण्यात आलेल्या मशालींमुळे तयार झालेला गडावरील हा नयनरम्य नजराना पाहण्यासारखाच होता. मंदिरासभोवताली विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भवानी माता मंदिर ते बुरुजापर्यंत लावण्यात आलेल्या मशालींमुळे गड व परिसर उजाळून निघाला होता. हा देखावा पाहण्यासाठी मात्र कोणताही भाविक नसल्याने गडावर शांतता होती.

रात्रीच्या किर्र अंधारात मशालींच्या उजेडाने उजळून निघालेला गड पाहण्यासाठी दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात लाखो भाविक येतात. पण, इतिहासात प्रथमच कोरोनाच्या संकटामुळे विना भाविक हा सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा जागर, गोंधळ, ढोल ताशा, आतिषबाजी व महाप्रसाद यासारखे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER