सरनाईकांच्या अडचणीत वाढ, धाकटे पूत्र पूर्वेशला ईडीची नोटीस

Purvesh Sarnaik

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रताप सरनाईक यांचे धाकटे पूत्र पूर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) यांनाही ईडीने (ED) नोटीस बजावल्याचीमाहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रताप सरनाईक यांचे धाकटे सुपूत्र पूर्वेश सरनाईक यांना गुरुवारी (10 डिसेंबर) ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टॉप्स सिक्युरिटी गैरव्यवहाराबाबत ही चौकशी करण्यात येत आहे. तसेच यात आणखी काही परदेशी व्यवहारही झाले आहेत, याचीही ईडीकडून चौकशी केली जात आहे.

ईडीला दोन क्रेडीट कार्ड सापडले असून ते दोन्ही विदेशी असल्याचे सांगितले जात आहेत. या दोन्ही क्रेडीट कार्डची इंट्री भारतात केली जात नाही. या क्रेडीट कार्डच्या खात्यात किती पैसे आहेत, किती व्यवहार झाले आहेत, याबाबत ईडीकडून चौकशी केली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER