..आता दुसर्‍या रावणाचा वध करण्यासाठी आलोय – खा प्रताप पाटील चिखलीकर

जिल्हयातील एका रावणाचा वध केला

Pratap Patil Chikhalikar

नविन नांदेड/प्रतिनिधी: गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नांदेड जिल्हयातील रावणाचा वध करुन मी नांदेड जिल्हयातील सर्वसामान्य नागरिकांला न्याय देण्याचे कार्य केले . आता नांदेड दक्षिण मधील रावणाचा वध करण्यासाठी मी आलो आहे . मी सर्वसामान्य नागरिकांचा लोकप्रतिनिधी आहे . या भागाच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या तिजोरीची चाबी माझ्याकडे असुन सर्वसामान्य नागरिकाचा विकास हेच माझे स्वप्न आहे . त्यामुळे येथील जनता माझ्या मागे राहिल हिच अपेक्षा व्यक्त करुन रावण दहन करत असल्याचे मत खा प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपाच्यावतीने हडकोत रावण दहन सोहळ्यात बोलताना व्यक्त केले .

भारतीय जनता पार्टीच्यावतीने हडको येथील बिजली हनुमान मंदिर परिसरात दि 8 आँक्टोबर रोजी सायकाळी रावन दहन सोहळाच्या आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाला नांदेड खा. प्रताप पाटील ,दिलिप कंदकुर्ते,दिपकसिंग रावत , संतोष वर्मा , नगरसेवीका बेबीताई गुपिले, सौ इंदुताई शिवाजी घोगरे ,शंकरराव ढगे , जिवन घोगरे , गुरुमितसिंघ महाजन , ईश्वर येमुल , आयोजक वैजनाथ देशमुख,संजय घोगरे ,याच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थिती होते .यावेळी खा प्रताप पाटील चिखलीकर पुढे म्हणाला की , सिडकोच्या घराच्या हस्तातरंणाचा प्रश्न सोडवु ,मी सर्वसामान्य नागरिकांचा खासदार आहे . मी चार पक्ष बदलो पण महाराष्ट्राच्या तिजोरीची चाबी माझ्याकडे आहे .

त्यामुळे आपल्या भागाचा विकास निश्चित करणार आहे . माझी चर्चा जिल्हयात काही लोक करत आहेत . गेल्या चार महिण्यापुर्वी जिल्हयातील एका रावणाचा दहन केले . आता नांदेड दक्षिण मतदार संघातील रावन दहन करत आहे . त्यामुळे जनतेचा विकास हेच माझे स्वप्न आहे .

गेल्या अनेकवर्षापासुन मनपाचे माजी उपमहापौर विनय गिरडे यांचे काम उल्लेखनी आहेत. त्याच्या कामाची दखल त्याच्या नेत्यानी घ्याला हवी परंतु त्याना वार्‍यावर सोडण्याचे काम केले आहे . गिरडे यांनी त्यांचे विकासाचे काम असेच चालु ठेवावेत त्याच्या विकास कामाला आमच्या शुभेच्छा आहेत . त्यामुळे आपण ऐकटे आहोत असे समजुने असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला . यावेळी ककपकपकजनता विथानसभेच्या निवडणुकीत योग्य निर्णय घेईल असे मला वाटते. यावेळी मोठ्याप्रमाणात नागरिक ,महिला ,युवक याची उपस्थिती होती .

मनुष्याच्या रावनाचे विचार संपुष्टात आणण्यासाठी रावन दहन -विनय पाटील
गेल्या काही वर्षापासुन माणसात दृष्ट प्रवर्ती वाढली आहे . याचा बळी सर्वसामान्य नागरिक होत आहेत . किती चांगले काम करा परंतु काही लोक हे रावणी विचारसरणी आचरणात आणुन काम करणार्‍याचे नुकसान करत आहेत . या प्रवृतीचा नाश करण्यासाठी माझे मिञ मंडळ रावण दहन कार्यक्रम करत आहोत . त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी रावण विचारसरणी असणार्‍या प्रवृतीपासुन लाब रहावे असे मनपाचे माजी महापौर विनय पाटील यांनी आपल्या रावण दहन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले . यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गणपतराव लोसलवार , बाबुराव येरगेवार , अ़रूण दमकोडवार , बापुराव जवादवार ,सर्व पञकार , सतिष बस्वदे ,आयोजक गजानन गिरडे , रवी रायबोले , दिपक गिरडे ,याच्यासह मोठ्याप्रमाणात महिला ,नागरिक ,युवक आणि परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती .