प्रशांत किशोर तृणमूल कॉंग्रेसकडून राज्यसभेत जाण्याची शक्यता

prashant kishor and mamata banerjee

नवी दिल्ली :- बिहारमध्ये नीतीशकुमार यांच्या जदयुमधून निष्कासित प्रशांत किशोर तृणमूल कॉंग्रेसकडून पश्चिम बंगालमधून राज्यसभेत जाण्याची शक्यता आहे. तृणमूलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल. बंगालमध्ये राज्यसभेच्या पाच जागा रिकाम्या होणार आहेत. या जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होईल.

महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे नाही, १५ वर्षे टिकेल – सुप्रिया सुळे

तृणमूल कॉंग्रेसचे नेतृत्व या जागांसाठी नवीन चेहर्‍यांना संधी देण्याची शक्यता आहे. चार जागांवर उमेदवारांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. पाचव्या जागेबाबत पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. विधानसभेच्या संख्याबळावर तृणमूलला राज्यसभेत चार जागा मिळतील; परंतु पाचवी जागा कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्या या जागेवर जोगन चौधरी, मनीष गुप्ता, अहमद हसन इमरान आणि के. डी. सिंह हे चारही खासदार तृणमूलचे आहेत.