निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांचा संन्यास

नवी दिल्ली : बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या अनपेक्षित विजयानंतर अनेकांनी सामनावीर म्हणून वर्णन केलेल्या प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. यापुढे आपण निवडणूक रणनीतिकार म्हणून संन्यास घेत आहोत, असे त्यांनी जाहीर केले.

प्रशांत किशोर यांनी एनडीटीव्हीला एका विशेष मुलाखतीत सांगितले की, ‘मी जे काम करत आहे ते पुढे सुरू ठेवण्याची इच्छा नाही. मी भरपूर काम केले आहे. जीवनात थोडी विश्रांती घेण्याची आणि काहीतरी करण्याची मला वेळ हवी आहे. हे काम सोडण्याची माझी इच्छा आहे. आपण पुन्हा राजकारणात येणार का? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले: ‘मी एक अयशस्वी राजकारणी आहे. मला परत जाऊन मला काय करावे लागेल ते पहावे लागेल’.

बंगाल निवडणुकीविषयी बोलताना ते म्हणाले की, हे निकाल तृणमूल कॉंग्रेसच्या (Trinamool Congress) बाजूने एकतर्फी वाटले तरी तो एक मोठा लढा होता. आमचा आत्मविश्वास वाढला आणि तृणमूलच्या नेत्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळवल्या.

सौजन्य : NDTV
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button