प्रशांत किशोर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे मुख्य सल्लागार नियुक्त

Prashant Kishor - Amarinder Singh

नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांची मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. अमरिंदर सिंग यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. पंजाबमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत.

अमरिंदर सिंग यांनी ट्विट केले – ‘पंजाबमधील लोकांच्या हितासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक!’ पंजाबच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊनच अमरिंदर सिंग यांनी प्रशांत किशोर यांची निवड केल्याची चर्चा आहे.

प्रशांत किशोर निवडणूक रणनीतिकार आहेत. त्यांची ‘आय-पॅक’ टीम सध्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस आणि तमिळनाडूत डीएमकेच्या निवडणूक प्रचाराच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळत आहे.

प्रशांत किशोर यांनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ( Jagan Mohan Reddy) यांच्यासाठी काम केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER