प्रणिती शिंदेंची बैठक भोवली; काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Praniti Shinde - Maharashtra Today

जळगाव :- आमदार प्रणिता शिंदे (Pranita Shinde) यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहामध्ये काँग्रेस पक्षाची बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. यामुळे २० ते २५ काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरुद्ध आज (मंगळवारी) रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार प्रणिती शिंदे १५ मे रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होत्या. यांच्या उपस्थितीत पक्षाचे पदाधिकारी व महत्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीचे आयोजन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील (Sandeep Patil) व इतर पदाधिकाऱ्यांनी केले. बैठकीचे आयोजन करण्यासाठी पक्षाने पोलीस व जिल्हा प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचा अभाव होता, तर काही जण विना मास्क होते. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या सर्वच नियमांचे उल्लंघन या बैठकीत करण्यात आले.

गुन्हा दाखल

रावेरचे काँग्रेस आमदार शिरीष चौधरी, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, यांच्यासह इतर २० ते २५ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button