उजनीच्या पाण्यावरून प्रणिती शिंदे आक्रमक; काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभेद

Praniti Shinde - Maharashtra Today

मुंबई : ‘प्राण जाये, पर पानी न जाये’, अशी भूमिका सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी उजनी धरणाच्या ५ टीएमसी पाण्याच्या  प्रश्नावर घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाला  आहे.

सोलापूर जिल्ह्यासाठी असणाऱ्या उजनी धरणातील पाणी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी त्यांच्या मतदारसंघातील २२ गावांसाठी नेल्याचा आदेश काढल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. त्या अनुषंगाने आज प्रणिती शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ‘प्राण जाये पर पानी  न जाये’ ही भूमिका त्यांनी घेतली. सोलापूरच्या हक्काचे एक थेंबदेखील पाणी नेऊ दिले  जाणार नाही, असे प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

 

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button