भुज द प्राईड ऑफ इंडियातील अभिनेत्री प्रणिता सुभाषने राम मंदिरासाठी देणगी देण्याचे केले आवाहन

Pranita Subhash Appeal made to donate for Ram temple

अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य असे मंदिर उभारले जाणार आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी जनतेकडून देणगी गोळा केली जाणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह (RSS) काही संस्थांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन देणगी गोळा करणार आहेत. या कामाला नुकतीच सुरुवात झाली. भव्य राम मंदिराच्या उभारणीत आपलाही खारीचा वाटा असावा असे प्रत्येकाला वाटत आहे त्यामुळेच राम मंदिर न्यासाकडे देणग्यांचा ओघ सुरु झाला आहे. साऊथची प्रख्यात अभिनेत्री आणि अजय देवगणच्या भुज द प्राईड ऑफ इंडियामधून (Bhuj- The Pride of India) हिंदीमध्ये येत असलेल्या प्रणिती सुभाष या नायिकेनेही राम मंदिराला देणगी दिली असून जास्तीत जास्त लोकांनी मंदिर बांधकामासाठी देणगी द्यावी असे आवाहन केले आहे. प्रणिता सुभाष कन्नड सिनेमा ‘राम अवतार’मध्ये दिसणार आहे. याशिवाय अजय देवगणचा ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ आणि प्रियदर्शनच्या ‘हंगामा टू’मध्येही दिसणार आहे. या सिनेमात परेश रावल आणि शिल्पा शेट्टी यांच्याही भूमिका आहेत.

प्रणिता सुभाष (Pranita Subhash) कन्नड़, तेलुगु आणि तामिळ सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्रणिताने 2010 मध्ये कन्नड़ सिनेमा ‘पोर्की’मधून करिअरला सुरुवात केली होती. तिन्ही भाषांमधील सिनेमांमध्ये प्रणिताने हिट सिनेमे दिले आहेत. प्रणिता सुभाषने अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. प्रणिताने ट्विटरवर देणगी देण्याची घोषणा केली असून यात तिने म्हटले आहे, अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी सुरु असलेल्या निधी समर्पण अभियानात मी एक लाख रुपये देण्याचा संकल्प करीत आहे, मी सगळ्यांना विनंती करते की या ऐतिहासिक क्षणाचे भागिदार व्हा. प्रणिताचे हे ट्विट प्रचंड व्हायरल झाले असून आतापर्यंत 30 लाखांपेक्षा जास्त लोकांनी ट्विट पाहिले असून अनेकांनी रिट्विट करीत मंदिरासाठी निधी देण्याचा संकल्पही सोडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER