प्रणव भोपळेची दुसऱ्यांदा गिनिज रेकॉर्डमध्ये नोंद

Pranav Bhopale

कोल्हापूर : फुटबॉल (Football) पंढरी कोल्हापुरातील (Kolhapur) फुटबॉलपटू प्रणव अशोक भोपळे (Pranav Ashok Bhopale) याची दुसऱ्यांदा गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) नोंद झाली आहे. वडणगे (ता. करवीर) येथील प्रणवने आपल्या फुटबॉल खेळातील कौशल्याच्या जोरावर हे यश मिळविले.

कपाळ व नाकावर फुटबॉल फिरवत ठेवण्याच्या या प्रकारामध्ये प्रणवने एका मिनिटात तब्बल ८१ वेळा फुटबॉल फिरविण्याचे कौशल्य दाखवून आपल्या नावावर नवा विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी ऑगस्ट २०२० मध्ये गुडघ्यावर फुटबॉलचा बॅलन्स करण्याचे कौशल्य करून गिनिज बुकमध्ये नाव नोंदविले होते.

लॉकडाऊनच्या कालावधीत त्याने फुटबॉलमधील ही कौशल्ये विकसित केली आहेत. प्रणव कळंबा येथील डी.वाय. पाटील प्रतिष्ठानमध्ये बी. ई. मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असून त्याला सावली केअर सेंटर द ब्रिज व वडणगे फुटबॉल क्लबचे मार्गदर्शन लाभले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER