ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या, अन्यथा संघर्ष – प्रकाश शेंडगे

मुंबई :  ‘ओबीसी समाजाच्या (OBC community) आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. जातीय सलोखा राखून मराठा समाजाला (Maratha reservation) आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको ही आमची भूमिका कायम आहे; अन्यथा संघर्ष अटळ आहे.’ अशी भूमिका ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी पत्रपरिषदेत मांडली.

माजी खासदार हरीभाऊ राठोड, दशरथ पाटील, जे. डी. तांडेल यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाची आरक्षणाबद्दल बाजू स्पष्ट केली. मराठा आणि ओबीसी संघर्ष टाळायचा असेल तर लक्ष द्या, असे सांगितले होते. पण सरकारने लक्ष दिले नाही. मराठा समाजातील काही लोक आता भटक्या समाजातील ओबीसी आरक्षणावर टीका करत आहेत, चूक आहे. मराठा आरक्षणावरून मराठा नेते प्रक्षोभक भूमिका घेतात.

मराठा आरक्षण हा विषय जातीय सलोख्याने हाताळला पाहिजे, सामाजिक वातावरण खराब होऊ नये, असे शेंडगे म्हणालेत. गरीब मराठा विद्यार्थ्यांचा ईडब्लूएस अंतर्गत विचार करावा. ईडब्लूएस अंतर्गत आरक्षण गरीब विद्यार्थी लाभ द्यावा, मेगाभरती त्वरित सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

धनगर आरक्षणासाठी वकिलांची फौज का नाही ?

धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल अध्यादेश का निघत नाही? ओबीसी, धनगर समाज यासाठी योजना निधी नाही आणि मराठा समजाला पाठीशी का घातले जाते आहे? मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज दिली. मग धनगर समाज आरक्षणासाठी वकिलांची फौज का दिली जात नाही, असा सवालही शेंडगे यांनी केला. महाजोतीसाठी ५० कोटी द्या, ओबीसी महामंडळाची मागणी पूर्ण करा, ३० सप्टेंबरपर्यंत ओबीसी मागण्या पूर्ण केल्या नाही तर राज्यात आंदोलन करू, असा इशाराही शेंडगे यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER