मोदींच्या कार्याला नौटंकी म्हणणे देशातील जनतेचा अपमान : प्रकाश जावडेकर

Prakash Javadekar-pm modi

नवी दिल्ली :- कोरोना परिस्थितीचा (Corona Outbreak) आढावा घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार टीका केली. कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदींनी केवळ नौटंकी केले आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. या आरोपाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“मोदींबद्दल बोलताना राहुल गांधींनी नौटंकी हा शब्दप्रयोग केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेसोबत कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहेत. हा शब्द देशाचा आणि देशातील जनतेचा अपमान करणारा आहे. आम्ही त्यांच्यासाठी नौटंकी शब्द वापरणार नाही, कारण त्यांची नौटंकी जनतेने केव्हाच बंद केली आहे.” असे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले. “राहुल गांधींचे विधान पाहिल्यानंतर एक बाब अधोरेखित झाली, ती म्हणजे टूलकिट तुम्हीच निर्माण केली आहे. ज्या पद्धतीच्या भाषेचा वापर, तर्क आणि लोकांमध्ये भीती पसरविण्याचा प्रयत्न चालू आहे, हा त्याच राजकारणाचा भाग आहे.” असेही जावडेकर म्हणाले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button