मजूरांच्या रेल्वे तिकीटाचे राजकारण ”उल्टा चोर कोतवाल को डाटें’ प्रकाश जावडेकर

Prakash Javadekar

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश सध्या लॉकडाऊनच्या तिस-या टप्प्यात आहे. मात्र, परप्रांतातून आपल्या मूळ राज्यात परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांकडून रेल्वेभाडे आकारले जात असल्याच्या बातमीनंतर कॉंग्रेस – भाजपात श्रेयवाद सुरू आहे. परंतु मुळात केंद्र सरकार कोणत्याही मजूरांकडून कोणतेच तिकीट शुल्क आकारत नसतानाही कालपासून यावर चर्चा पाहायला मिळत आहे. यावरूनच केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॉग्रेसला उल्टा चोर म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर स्थलांतरित मजुरांना विशेष रेल्वेने त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येत आहे. यापुर्वी त्यांच्या परतीच्या विषयावरून श्रेय घेणारे विरोधक आता त्यांच्या रेल्वे तिकीटांवरून राजकारण करत आहेत अशा आशयाचे ट्विट पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.

केंद्र सरकार या मजुरांना तिकीट भाडे आकारत असेल तर कॉंग्रेस या मजुरांच्या तिकीटांचा खर्च उचलेल असे सोनिया गांधींनी म्हटले परंतु मुळात केंद्र सरकार मजुरांना असे कोणतेही तिकीट शुल्क आकारत नसून, रेल्वेभाडय़ातील ८५ टक्के वाटा केंद्र आणि १५ टक्के वाटा राज्य सरकार उचलेल. असे ठरले आहे. त्याप्रमाणे भाजप शासित राज्य सरकार मध्यप्रदेश, बिहार येथील सरकारने मजुरांचे प्रवास भाडे माफ केले आहे. असे असताना कॉंग्रेसच्या सहकार्याने स्थापन झालेले महाराष्ट्रातील सरकार तसेच राजस्थान राज्य सरकारच मजुरांकडून तिकीट शुल्क आकारत असल्याचे सांगत यालाच म्हणतात चोराच्या उल्ट्या बोंबा अशी टीका जावडेकर यांनी केली .

कॉंग्रेसला एवढीच मजुरांची चिंता असेल तर ज्या राज्यांमध्ये त्यांचे आघाडी सरकार सत्तेत आहे त्या महाराष्ट्र. केरळ आणि राजस्थानमध्ये जे मजुरांकडून रेल्वे तिकीटांचे दर वसूल करत आहेत तेथे त्यांना मोफत प्रवास करावा. असे जावडेकर यांनी ट्विट करून म्हटले आहे.

मजुरांच्या रेल्वेभाडय़ाचा खर्च काँग्रेस उचलेल, या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले त्यावरून जावडेकर यांनी विरोधकांना उत्तर दिले.