प्रकाश जावडेकरांना कोरोनाची लागण; मुख्यमंत्री येडियुरप्पा दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह

Prakash Javadekar - B.S. Yediyurappa - Corona Positive

मुंबई : देशात कोरोना (Corona) प्रादुर्भावाची दुसरी लाट पसरली आहे. आतापर्यंत कोरोनाची लागण सर्वसामान्य नागरिक ते लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांनाही झाली आहे. तर आता केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे जावडेकर यांनी ट्विट करून सांगितले आहे. तसेत त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही कोरोनाची चाचणी करण्यास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत सांगितले आहे की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे गेल्या २ ते ३ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी.” असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ८ महिन्यांत दुसर्‍यांदा येडियुरप्पांना कोरोनाची लागण झाली.

येडियुरप्पा यांनीसुद्धा ट्विट करत कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “मला सौम्य ताप आल्यानंतर कोरोना चाचणी केली असता, मला संक्रमण झाल्याचे समजले. सध्या मी ठीक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मला रुग्णालयात दाखल केले जात आहे.” अशी माहिती येडियुरप्पा यांनी दिली. येडियुरप्पा यांनी अलीकडेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला.

मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीएम येडियुरप्पा यांना ताप आला होता आणि त्यानंतर ते तपासणीसाठी रामय्या रुग्णालयात गेले. तिकडे कोरोनाची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button