प्रकाश आंबेडकरांचे अकोल्यातही शक्तिप्रदर्शन; दाखल केला उमेदवारी अर्ज!

Prakash Ambedkar's Filed nomination application in Akola

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली असून, राज्यातील सर्वच लोकसभा मतदार संघात आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोमवारी स्वतः सोलापूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. आणि आज अकोला मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करून विरोधकांना मोठा धक्का दिला आहे.

ही बातमी पण वाचा:- सर्व वंचितांचे आभार; आपल्या सहकार्यामुळे परिवर्तन नक्कीच होणार!…..

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आजचा शेवटचा दिवस असल्याने प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अकोला निवडणूक अधिकारी कार्यालय गाठून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी घातलेल्या रंगीबेरंगी पोशाखाची मोठी चर्चा सुरु होती. दरम्यान सोलापूरनंतर अकोल्यातून आंबेडकरांनी अर्ज दाखल केल्याने विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे.