… प्रकाश आंबेडकरांना स्वीकृत नगरसेवक म्हणूनही घेणार नाही – निलेश राणे

Nilesh Rane-Prakash Ambedkar

मुंबई : मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही राजेंवर टीका केली, त्याविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘एक राजा बिनडोक आहे’ या शब्दात प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजेंवर (Udyanraje) नाव न घेता टीका केली होती. त्यावर – राजेंना राज्यसभेवर घेतले पण प्रकाश आंबेडकरांना कोणी स्वीकृत नगरसेवक म्हणून देखील घेणार नाही असा टोमणा भाजपाचे (BJP) नेते माजी खासदार निलेश राणेंनी मारला.

याबाबतच्या ट्विटमध्ये निलेश राणे (Nilesh Rane) म्हणालेत – प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) पुन्हा गरळ ओकली. दोन ठिकाणी लोकसभा निवडणुकीत उभे राहूनसुद्धा जेमतेम फक्त डिपॉझिट वाचू शकले. त्यांची राजघराण्याबद्दल बोलायची लायकी नाही, राजेंना राज्यसभेवर घेतले पण प्रकाश आंबेडकरांना कोणी स्वीकृत नगरसेवक म्हणून देखील कोणताही पक्ष घेणार नाही.

प्रकाश आंबेडकर

दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे असे कुठेही वाटले नाही. एक राजा बिनडोक आहे, तर दुसरे संभाजीराजे. त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे परंतु ते आरक्षणसोडून इतर मुद्द्यावर भर देत आहेत. घटना कळत नसताना भाजपाने राज्यसभेवर पाठवले कसे? हा प्रश्न उपस्थित होतो, संभाजीराजे आरक्षण सोडून इतर मुद्द्यावर जास्त भर देतात या शब्दात प्रकाश आंबेडकरांनी संभाजीराजे आणि नाव न घेता उदयनराजेंवर टीका केली.

…तर महाराष्ट्रात यादवी माजली असती.

अनेक मराठा समाजाचे कार्यकर्ते चांगले आहेत, महाराष्ट्र घडवलेला असे राज्यकर्ते आहेत, नेतृत्वाचा विषय त्यांचा आहे. आरक्षणाचा मुद्दा विचलित करण्याचा प्रयत्न काही जणांचा आहे, ज्यांना घटना माहिती नाही, त्यांनी बोलू नये, आरक्षण हे घटनेने दिले आहे. ज्यांना आरक्षण दिले त्यांच्याशी उघड भांडण करायचे आहे का? मराठा समाजाचे मोर्चे निघाले तसे ओबीसी समाजाचे निघाले होते; तेव्हा मी शांत राहण्याचं आवाहन केले अन्यथा महाराष्ट्रात यादवी माजली असती. शांत असले वातावरण पेटवण्याचे काम करू नका. स्वत:चे अस्तित्व राखण्यासाठी जातीचा वापर केला जातो, अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER