प्रकाश आंबेडकर लढणार बिहार विधानसभेची निवडणूक

Prakash Ambedkar

मुंबई :- महाराष्ट्रात (Maharashtra) वंचित बहुजन आघाडीची (VBA) मतपेढी निर्माण केल्यानंतर आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी बिहार विधानसभेची निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. ट्विट करून आंबेडकर यांनी ही माहिती दिली.

ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे – बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुका देशाच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असे आम्हाला वाटते. सर्वांनी एकत्र येऊन बिहारमधील एनडीएचे सरकार पाडले तर केंद्रातील मोदी सरकारही पाडता येईल, असे आम्हाला वाटते. त्यामुळेच आम्ही समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावरून लक्षात येते की प्रकाश आंबेडकर बिहारमधील निवडणूक इतर पक्षांशी आघाडी करून लढणार आहेत. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, महाराष्ट्रात कधी स्वबळावर तर कधी असे प्रयोग त्यांनी केले आहेत.

आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून राज्यात एमआयएमला सोबत घेऊन लोकसभा निवडणूक लढवली होती. समविचारी छोट्या छोट्या पक्षसंघटनांनाही सोबत घेतले होते. मात्र, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीसोबत (NCP) आघाडी केली नव्हती. दोन्ही काँग्रेसने, त्यांनी कधीही न जिंकलेल्या लोकसभेच्या १२ जागा वंचितसाठी सोडाव्यात, अशी मागणी आंबेडकरांनी केली होती. त्यावर मतैक्य न झाल्याने एमआयएमला सोबत घेऊन वंचितने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत आंबेडकरांचा एकही उमेदवार निवडून आला नाही मात्र, त्यांनी बरी मत घेतली होती. वंचितच्या मदतीमुळे एमआयएमचे (MIM) इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) औरंगाबादमधून (Aurangabad) निवडून आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER