…अन्यथा रस्त्यावर उतरू; प्रकाश आंबेडकरांचा निर्वाणीचा इशारा

Prakash Ambedkar - CM Uddhav Thackeray

पुणे :- राज्यात कोरोनाचे संकट (Corona Crises) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं वीकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लागू केले आहेत. वीकेंड लॉकडाऊन सांगत सातही दिवस लॉकडाऊनची (Corona Lockdown) स्थिती निर्माण केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून राज्य सरकारवर करण्यात येत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.

राज्यातील नागरिक लॉकडाऊनला विरोध करण्याच्या तयारीत आहेत. लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकार कोणतीही मदत करायला तयार नाही. लोकांनी विरोध करण्यापूर्वी राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय परत घ्यावा. सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर अनेक लोक दुकाने सुरू करायला लागतील. तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. सरकारला आम्हाला अटक करायची असेल तर करा. पण आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला दिला.

गेल्या वर्षी जे जम्बो कोविड सेंटर सुरुवातीला सरकार चालवत होते. ते नंतर खाबूगिरीसाठी नातेवाईक आणि एनडीओंना चालवायला दिले, अशी घणाघाती टीकाही आंबेडकरांनी राज्य सरकावर केली. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक आणि छोटे व्यापारी, व्यावसायिक भरडले जात आहेत. त्यामुळे सरकारने लॉकडाऊनच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. अन्यथा राजकीय दृष्टीनेच विचार करावा लागेल, असे आंबेडकर यांनी म्हटले.

ही बातमी पण वाचा : बाबासाहेब आंबेडकर जयंती ;  प्रकाश आंबेडकरांनी केले आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button