प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापुरातून पीछाडीवर

prakash ambedkar

सोलापूर : संपूर्ण देशाचे लक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला या दोन्ही ठिकाणांहून निवडणुकीच्या रिंगणात आहेत . मात्र सध्या दोन्ही ठिकाणांहून ते पीछाडीवर आहेत . महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून राज्यात चार टप्प्यांत मतदान पार पडलं होतं. राज्यात अनेक ठिकाणी अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे यावेळी वंचित बहुजन आघाडी सर्व जागांवर निवडणूक लढवत असून तिला किती जागा मिळतात हे पाहणंही विशेष आहे. सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्यात चार टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान पार पडले होते. यामध्ये नितीन गडकरी, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे, सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा यांच्यासह अनेक उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले होते.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा : http://bit.ly/LoksabhaResults