बांग्लादेशी, पाकिस्तानी मुस्लीमांची आकडेवारी द्या; प्रकाश आंबेडकरांचे राज ठाकरेला आव्हान

Prakash Ambedkar to Raj Thackeray

मुंबई :-  नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि देशातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे.ठिकठिकाणी वंचितच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको, निषेध केला जात आहे. तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. सीएएच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जे भाष्य केलं त्यावरुन एका वृत्तवाहिनीला बोलतांना वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

राज ठाकरे भडकविण्याचे काम करत आहे. जर आपण एखाद्या गोष्टीची सत्यता पडताळली असेल तर त्यांनी राज्यात बांग्लादेशी, पाकिस्तानी मुस्लीम किती याची आकडेवारी द्यावी. पुरावे नसताना राजकीय भाषणबाजी करायची याला अर्थ नाही असं विधान आंबेडकरयांनी केले आहे .

दरम्यान वंचितच्या आंदोलनाला हिंसक वळण देण्यामागे भाजपा-आरएसएसचा डाव आहे. चेंबूर येथे काही कार्यकर्त्यांकडून बसची तोडफोड करण्यात आली. मात्र हे कार्यकर्ते वंचितचे नव्हते. काहीजण तोंडावर रुमाल बांधून आले होते त्यांनी ही दगडफेक केली. वंचितचे कार्यकर्ते चेहरे लपवून आंदोलन करत नाहीत. आंदोलन बदनाम करण्यासाठी अशाप्रकारचं षडयंत्र केलं जात आहे. पोलिसांनी या चेहरे लपवणाऱ्या लोकांचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

‘एनआरसी, सीएए विरोध ; वंचित आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक